दक्षिण रत्नागिरी भा.ज.पा. जिल्हा कार्यालयाला नवा साज

0

रत्नागिरी : भाजपा रत्नागिरीने गेल्या सहा महिन्यात आपल्या कामकाजात गतिमानता आणली. सेवाकार्य, मदत वितरण, विविध प्रश्नांसंदर्भात दाद मागने, संघटनात्मक नवी रचना, प्रदेश नेत्यांचे वाढते दौरे या सर्व गोष्टी भा.ज.पा.ची ताकद वाढल्याचे निदर्शक आहेत. अॅड. दीपक पटवर्धन यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर अनेक बदल झाले. कार्यपद्धतीमध्ये बदल झाले. त्याच प्रमाणे आपल्या खास काम करण्याच्या शैलीचा अवलंब करत ‘वसंत स्मृती’ या जिल्हा कार्यालयाचे नूतनीकरण करण्याचे ठरवून, तो निर्णय अमलात आणला, कोरोना संकटामध्ये लॉकडाऊनमुळे कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचे येणे-जाणे नसल्याने या कालखंडाचा उपयोग करत भा.ज.पा. जिल्हा कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास नेण्यात आले. कोणतेही कार्यालय सकारात्मक उर्जेचा स्त्रोत असेल, तर काम अधिक यशस्वी होते. उत्साह वाढतो. याचा विचार करत भाजपा कार्यालयाचे रुपडे अंतर्बाह्य नवीन रुपात अद्यावत करण्यात आले. कार्यालयाला कार्पोरेट लूक देण्यात आला. एक प्रशस्त संपूर्ण पारदर्शक केबिन तसेच 150 कार्यकर्ते बसून बैठक करू शकतील या दृष्टीने उत्तम प्रकाश व्यवस्था असणारे सभागृह, स्वच्छ प्रशस्त वरांडा, संपूर्ण भागाला काचेचे पार्टिशन आणि सभागृहात नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा यांचे विजय मुद्रेतील पोट्रेटसह डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल शर्मा, श्रद्द्येय अटलजी यांची पोट्रेट तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नद्दासाहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व महाराष्ट्राचे नेते मा. देवेंद्र फडणवीस यांची पोट्रेट या सभागृहात कार्यकर्त्यांना वेगळी अनुभूती देतील. भाजपाचे हे ‘वसंत स्मृती’ नावाने ओळखले जाणारे कार्यालय मा. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटित झाले आहे. या कार्यालयाचे नूतनीकरण करून कार्यकर्त्यांना हुरूप वाटेल, आनंद वाटेल असे कार्यालयाचे रूप असावे ही मनापासूनची इच्छा होती. अध्यक्ष झाल्यानंतर यासाठी रचना केली. वरिष्ठांची परवानगी प्राप्त केली आणि संपूर्ण सात्विक लक्ष्मी च्या आशीर्वादाने हे कार्यालयाचे नवे रूप साकारण्यात यश आले. युवा मोर्चाचे नूतन अध्यक्ष विक्रांत जैन यानेच या कार्यालयाचे काम उत्तम पद्धतीने केले आणि उद्घाटनापूर्वी या कार्यालयाच्या खर्चाचे सर्व हिशेब पूर्ण करून कार्यकर्त्यांना एक नवीन संदेश की जो पारदर्शकता आणि आत्मनिर्भरतेचा देता आला असे अॅड. पटवर्धन म्हणाले. नूतनीकृत कार्यालयात लवकरच पक्ष काम सुरू होईल. कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी हे कार्यालय आतुर आहे. नव्या रूपातील कार्यालय लवकरच कार्यरत होईल अशी माहिती अॅड. पटवर्धन यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:15 PM 18-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here