बेदरकारपणे दुचाकी चालवत टाटा इंट्राला धडक; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

0

खेड : बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या टाटा इंट्रा गाडीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी एकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शनिवार १८ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. सुमारास भेलसाई चौथाई गंगवाडीकडे जाणाऱ्या रोडजवळ घडली. मंगेश कृष्णा निकम (रा. शेल्डी गावठण कातकरवाडी, खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात दत्ताराम शंकर कदम (४८,रा,भेलसई चौथाई वरची वाडी,खेड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी दत्ताराम कदम आपल्या ताब्यातील टाटा इंट्रा गाडी (एमएच-०८एपी-२६९९) घेऊन आंबडस मार्गे भेलसई येथे जात होते. त्याच सुमारास मंगेश आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एसी-८०९५) घेऊन शेल्डीकडून आंबडसकडे भरधाव वेगाने जात असताना त्याने समोरुन येणाऱ्या कदम यांच्या गाडीला समोरुन धडक दिली. यात तो स्वतःजखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. या बाबत अधिक तपास पोलिस हेड काँ. चव्हाण करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:50 PM 20-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here