‘अंगणवाडी सेविकांना कोरोना कामातून वगळण्यात यावे’

0

चिपळूण : अंगणवाडी सेविकांना त्यांची मूळ कामे पार पाडण्यासाठी कोरोना विषयक कामातून वगळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक चिटणीस विष्णू आंब्रे यांनी केली आहे. अंगणवाडी सेविकांना नागरी व ग्रामीण भागात कोरोना संबंधित कामे करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सक्ती करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी नागरिकांना प्रत्यक्ष गृहभेटी देऊन ताप सर्दी व खोकला आदी लक्षणे असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी दडपशाही व सक्ती करण्यात येत आहे. कोरोनाविषयक कामे सांगितल्यास त्यांच्या कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क झाल्यास त्यांच्यामार्फत लाभार्थी, गरोदर व स्तनदा मातांना संसर्ग होऊ शकतो, असे विष्णू आंब्रे यांनी नमूद केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 20-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here