दुबईतील जेएमबीआर फाऊंडेशनतर्फे वादळग्रस्त शाळांना मदत

0

खेड : निसर्ग चक्रीवादळामध्ये कोकण व त्यात प्रामुख्याने दापोली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरे, शेती, फळबागा तसेच शाळांचेही नुकसान झाले आहे. शाळा तसेच इतर शैक्षणिक इमारतींची पडझड व नुकसानही महत्त्वाची बाब आहे. यासाठी तत्परतेने पाठपुरावा तसेच इतर सेवाभावी संघटना, समूह व दानशूरांनी सहकार्य करण्याचे आवाहन आ. योगेश कदम यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत खेडचे सुपुत्र व दुबईतील प्रतिष्ठित उद्योजक बशीर हजवानी यांनी त्यांच्या जेएमबीआर फाऊंडेशनच्या वतीने दापोली तालुक्यातील नुकसानग्रस्त माध्यमिक शाळांना पुनर्बाधणीसाठी आर्थिक सहाय्य करण्यास सुरुवात केली आहे. दापोली मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांच्या उपस्थितीत व जेएमबीआर फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांच्या हस्ते दापोली तालुक्यामधील काही माध्यमिक शाळांना नुकतेच आर्थिक साहाय्याचे वाटप करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:33 PM 20-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here