खबरदारी म्हणून चिखली कदमवाडी आयसोलेट

0

गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यात सगळ्यात प्रथम कोरोना रुग्ण हा शृंगारतळी येथे सापडला होता. त्यानंतर काही नागरिकांना कोरोना होऊन नंतर गुहागर तालुका हा संपूर्ण कोरोनामुक्त झाला होता. मात्र आता याच गुहागर तालुक्यातील चिखली येथे तब्बल ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने चिखली आता हॉटस्पॉट बनले असून चिखली कदमवाडी आयसोलेट करण्यात आली आहे. गुहागर-चिपळूण या मुख्य मार्गावरील चिखली हे गाव या गावात गेल्या दोन दिवसापूर्वी एकूण ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून चिखली कदमवाडी आयसोलेट करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:12 PM 20-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here