रत्नागिरी खबरदारचा नवा उपक्रम : पहिलं पान, आपला मान !

0

रत्नागिरी : क्षणार्धात लाखो वाचकांपर्यंत रत्नागिरी आणि जगभरातील बातम्या पोहचवणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणून ओळख असणारे रत्नागिरी खबरदार हे वृत्तपत्र गुरुवार दिनांक २३ जुलै पासून एका नवीन उपक्रमाला सुरुवात करणार आहे. डिजिटल माध्यमातून जगभरातील लाखो वाचकांपर्यंत पोहोचणाऱ्या रत्नागिरी खबरदारचा साप्ताहिक अंक प्रिंट स्वरूपात दर गुरुवारी प्रसिद्ध होतो. शासकीय कार्यालय व वार्षिक वर्गणीदार यांच्यापर्यंत हा अंक पोस्टाच्या माध्यमातून पोहोचवण्यात येतो. हा अंक येत्या गुरुवार पासून उत्तम दर्जाच्या रंगीत छपाईत प्रसिद्ध होणार असून या अंकाच्या पहिल्या व दुसऱ्या पानावर रत्नागिरी जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वसामान्य व विशेष व्यक्तींचे कर्तुत्व लेखाच्या स्वरूपात झळकणार आहे. दर गुरुवारी एक व्यक्ती याप्रमाणे रत्नागिरी खबरदारचा साप्ताहिक अंक प्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे हि लेखमाला प्रायोजित नसणार आहे. विशेष व्यक्तींसोबत सर्वसामान्य कर्तृत्ववान व्यक्तींना देखील पृष्ठ क्रमांक एक सारखे ‘मनाचे पान’ मिळावे म्हणून पहिलं पान, आपला मान ! हा प्रपंच आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:10 PM 20-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here