रत्नागिरी : फूलकिडींचा प्रादुर्भाव झालेल्या बागायतींचे सर्वेक्षण करण्याची मागणी

0

रत्नागिरी : बदलत्या वातावरणाने आणि अपेक्षित गारठा न पडल्याने आंबा बागायततीत फूलकिडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आंबा बागांचे अतोनात नुकसान होत आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने तातडीने करावे, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे.

तौक्ते वादळानंतर आंबा बागांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. फळमाशी नियत्रंणासाठी बागायतदार गेली दोन वर्षे झगडत होते. यावर्षी हा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असतानाच फूलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कित्येक वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आंब्यावर फूलकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे. कोणत्याही कीटकनाशकांचा त्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान होत आहे. यासंदर्भात फूलकिडीने झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करा आणि वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनाकडे पाठवा, अशी मागणी केली आहे.

फूलकीड नियत्रंणात आणण्यासाठी विविध प्रयोग करणे आवश्यक आहेत. त्यामुळे प्रशासनाने आंबा संशोधन उपकेद्रांत किटकशास्त्रज्ञाची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसांत ही नेमणूक होण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 12/Feb/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here