रत्नागिरी : मांडवी बंधाऱ्यावरील चौथा रॅम्प प्रगतीपथावर

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या राजीवडा-चवंडेवठार ते मांडवीपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावरच्या ६ पैकी ३ रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. चौथ्या रॅम्पचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही कामे झाल्यानंतर येथील बंधाऱ्यावरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. रॅम्पची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुशांत ऊर्फ मुन्ना चवंडे लक्ष ठेवून आहेत.

राज्य शासनाकडून बंधाऱ्यासाठी ७ कोटी रुपये मंजूर करून घेण्यासाठी मुन्ना चवंडे यांनी प्रयत्न केले. त्यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांचेही सहकार्य मिळाले. बंधाऱ्यावर रस्त्यासह ६ रॅम्प होणार आहेत. त्यातील ३ पूर्ण होऊन चौथ्या रॅम्पचे काम अंतिम टप्प्यात आहे. याठिकाणी जुने दगड वापरले जाऊ नयेत, यासाठी माजी नगरसेवक मुन्ना चवंडे लक्ष ठेवून आहेत. कामाच्या वेळी कोणताही अडथळा आला तरी ते तो सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 12/Feb/2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here