कातकरी बांधवांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जमिनीचे अद्ययावत 7/12 वाटप

0

ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षण!

कातकरी बांधवांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जमिनीचे अद्ययावत 7/12 वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृह येथे झाला.

प्रातिनिधिक स्वरूपात 17 कुटुंबांना वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये समिती स्थापन केली होती.
चावडी वाचनाचे फडणवीस यांनी आदेश दिले होते. त्यातून आजचा दिवस उगवला. त्यातून मूळ मालकांना जमिनी परत करण्यात आले.
200 रुपये, किंवा आठवड्यातून एकदा चिकन देऊन सावकारांनी जमिनी हडपल्या होत्या.

देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता, वृद्धांना जमिनी परत मिळाल्या.
जमीनदार असून झोपडीत राहत होता कातकरी समाज
नागरिकांनी अनन्वित छळाच्या कहाण्या सांगितल्या.

आता जागेचा ताबा द्या, शासकीय खर्चाने त्यांच्या जागेवर मालकी पाट्या लावून द्याव्या, योग्य बाउंड्री आखून द्या: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

◼️ या नागरिकांना दिला जागेचा 7/12
गोपाळ रामा बाघ, अंकुश जान्या गोडी, दशरथ खाले, रविन्द्र हावरे, वसंत पागी, विमल तुंबडे, चंदर खाले, सुभाष होड़ी, रीमा कातकरी, सखू संतोष बाबर, यमुना, मालती जाधव

पक्ष न पाहता प्रश्न सोडविणारा नेता मी वसंतदादा पाटील यांच्यानंतर महाराष्ट्रात पाहिला : विवेक पंडित यांनी काढले गौरवोद्गार

◼️ देवेंद्र फडणवीस यांचे मनोगत:

  • संविधानाने दिलेले अधिकार
  • ⁠या कुटुंबांना परत, जे त्यांचे आहे, तेच त्यांना परत
  • हा गुलामीतून मुक्त करण्याचा कार्यक्रम
  • खऱ्या आदिवासींना सर्व लाभ मिळावे, असा GR जारी करा
  • भविष्यात कुणी जमिनी हडपू शकणार नाही, अशी व्यवस्था पोलिसांनी उभारावी
  • आज ज्या 17 जणांना जमिनी दिल्या, त्यांच्याकडे दर महिन्याला भेट देऊन, कुणी त्यांना धमकाविते का, याची माहिती घेत रहा
  • कातकरी समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 12-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here