भाजप महासत्ता नव्हे तर कमकुवत पक्ष : रविंद्र धंगेकर

0

मुंबई : अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या सदसत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्या या निर्णयावरुन राजकीय पक्षातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

पुण्यातील कसबा मतदार संघाचे आमदार असलेले रविंद्र धंगेकरांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप महासत्ता नाही तर भाजप कमकुवत असल्याचं धंगेकर म्हणाले आहेत. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

रविंद्र धंगेरकर म्हणाले की, भाजप ज्या पद्धतीने स्वत:ला महासत्ता समजते आणि त्यांना कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते लागत आहेत. म्हणजेच भाजप आता महासत्ता नाही तर कमकुवत पार्टी झाली आहे. या सगळ्या बाहेरच्या नेत्यांशिवाय भाजप पुढे पावलं टाकू शकणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसचा आदर्श नेता भाजपात घेऊन चालले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 13-02-2024

📢▪️ रत्नागिरी खबरदारच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी आजच संपर्क साधा 9421187576 या क्रमांकावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here