मिरजोळेतील भूस्खलनाकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज

0

रत्नागिरी : मिरजोळे मधलीवाडी येथे नदीकिनारी होणारे भुस्खलन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलण्याची गरज आहे. येथील शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेली भातशेती अडचणीत आली आहे. वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत तर काही अंतरावर असलेल्या घरांनाही भविष्यात धोका पोचू शकतो. याबाबत संरक्षक भिंतीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम ग्रामस्थांकडून सुरु आहे. त्याला प्रशासनासह लोकप्रतिनिधींची जोड मिळणे गरजेचे आहे. याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. खचलेल्या भागापासून चारशे मिटर अंतरावर काही घरे आहेत. वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर कदाचित त्याला धोका पोचू शकतो. येथे सुरक्षीत उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 21-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here