‘टी-20 वर्ल्डकप’ अखेर आयसीसीने पुढे ढकलला

0

नवी दिल्ली : कोरोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयसीसीने सोमवारी ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. तसेच भारतात होणारी विश्वचषक स्पर्धाही पुढे ढकलला आहे. या दोन्ही स्पर्धा 2021 आणि 2023 मध्ये भारतात होणार आहेत. ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वचषक खेळवणे जोखमीचे आहे असे म्हंटल्यानंतर आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलियात आगामी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन केला. मध्यंतरीच्या काळात ऑस्ट्रेलियन सरकारने नियमांमध्ये शिथीलता आणली होती. मात्र, रुग्णांची संख्या वाढताच सरकारने परत लॉकडाउन घोषित केले आहे. देशातली एकंदर परिस्थिती आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियावरचे आर्थिक संकट लक्षात घेता, विश्वचषकाचे आयोजन करणे अशक्य असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानंतर स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलणे ही फक्त एक औपचारिकता मानली जात होती. दरम्यान 2021 साली होणारा टी-20 विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाईल असंही आयसीसीने जाहीर केले आहे. टी-20 विश्वचषकाचे आयोजन पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयसमोर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेराव्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली होती, फक्त आयसीसीने टी-20 विश्वचषकाबद्दल अधिकृत घोषणा करण्याची वाट बीसीसीआय पाहत होते. आयसीसीने याबाबत घोषणा केल्यानंतर लवकरच बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:49 PM 21-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here