खेड कोकण रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धिंगाणा

0

खेड : कोकण रेल्वे मार्गावरील खेड रेल्वे स्थानकात एका अज्ञात माथेफिरूने अक्षरशः धिंगाणा घालत कार्यलयावर तुफान दगडफेक केल्याची घटना सोमवार सकाळी ९.३० वाजण्याचा सुमारास उघडकीस आली. यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला. माथेफिरूने कोकण रेल्वेच्या स्टेशन मास्तर कार्यालयावर दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान या सगळ्या प्रकारात त्याने प्रवाशांवर दगडफेक सुरू केली. यामध्ये एक प्रवासी जखमी झाला आहे. या प्रकारानंतर तो माथेफिरु स्थानकानजिकच्या जंगलात पळून गेला मात्र त्या माथेफिरूला रिक्षाचालक आणि स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर जखमी प्रवाशाला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here