आपत्तकालीन स्थितीत खताचा अतिरिक्त साठा उपलब्ध

0

रत्नागिरी : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून वैयक्तिक पातळीवर खतांचा जादा साठा करुन ठेवला आहे. तरीही खताची कमतरता भासू नये यासाठी खताचा आरक्षितचा साठा जिल्ह्यात उपलब्ध असून खताचा पुरवठा मुबलक असल्याचा निर्वाळा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांनी दिली. अनेक जिल्हयात खत टंचाई होत असल्याचे वृत्त येत आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी सूर उमटत आहे; पण चालू खरीप हंगामात आतापर्यंत दीड लाख टन खतांची विक्री झाली. गेल्या वर्षी संपुर्ण हंगामात सव्वा लाख टन खतांचा वापर झाला होता, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर खताचा अतिरिक्त साठा आपत्तकालीन स्थितीत उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात खताचा पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा कृषी विभागाने दिला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:49 PM 21-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here