रत्नागिरी : गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतजमीनींचे अथवा बागयतीचे नुकसान झाले असल्यास त्याचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला होता. अनेक भागात त्यामुळे मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी तालुक्यात मिरजोळे येथे जोरदार पावसाने शेत जमिनीला भेगा पडल्या. त्यामुळे येथील शेतजमीन धोक्यात आली आहे. तसेच हातीस, तोणदे येथे वावटळीने सुपारी, नारळ बागायतीचे नुकसान झाले. या भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:16 PM 21-Jul-20
