कर्ज फेडण्यासाठी ७७ वर्षाची महिला उतरली रॅम्पवर

0

अनेकवेळा आपल्याला अर्थिक अडचणी येत असतात. त्या अडचणी दूर करण्यासाठी कर्ज घेतले जाते. मग पुन्हा कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी उत्पन्नाचे दुसरे मार्ग शोधावे लागतात. याचीच प्रचिती दक्षिण कोरियामध्ये पाहायला मिळाली आहे. पण हे ७७ वर्षाच्या वृद्धेच्या बाबतीत घडले आहे. चोई सून असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. आपला जीवनसाथी गमावल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. कर्ज फेडण्यासाठी त्या एका रूग्णालयात काम करू लागल्या. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, माझे कमावलेले पैसे सगळे कर्ज फेडण्यातच जाऊ लागले आहेत. कामावर असताना मी टी व्ही वर मॉडलिंगची जाहिरात पाहिली. त्याचवेळी मी निर्णय घेतला. मॉडेलिंग करण्याचा. त्यावेळी चोई  फॅशन आयकॉन बनन्यासोबत कोरियाच्या सर्वात वृद्ध मॉडेल बनल्या. 

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here