दुध अनुदानाकरिता चिपळूण भाजपतर्फे निवेदन

0

चिपळूण : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला सरसकट दहा रुपये अनुदान द्या आणि दूध भुकटीकरिता प्रति किलो ५० रुपये अनुदान द्या या मागणीचे निवेदन चिपळूण भाजपच्या वतीने नुकतेच तहसीलदारांना देण्यात आले. तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर यांनी शिष्टमंडळासमवेत शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन दिले. निवेदन देताना शहराध्यक्ष आशिष खातू, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, मंदार कदम आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 22-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here