नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ७५ वी जयंती. यानिमित्ताने वीर भूमीवर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आदरांजली वाहिली. वीर भूमीवर राजीव गांधी यांचे पुत्र राहुल गांधी, मुलगी प्रियांका गांधी, काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांनी देखील आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून राजीव गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. २० ऑगस्ट १९४४ रोजी राजीव गांधी यांचा जन्म झाला होता. ते सर्वात कमी वयात पंतप्रधान बनले होते. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी एअर इंडियामध्ये पायलट म्हणून काम केले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने ४०१ जागा जिंकल्या होत्या.
