जिल्ह्यात 24 तासात 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; दोघांचा बळी

0

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 27 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या 1336 झाली आहे. तर दोघांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. बुरोंडी, दापोली येथील एका 60 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर मागल, लांजा येथील 56 वर्षीय कोरोना रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 44 झाली आहे.

27 कोरोना पॉझिटिव्ह आहवालांत जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – ११ रुग्ण,,उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 8 रुग्ण, दापोली – 4 रुग्ण, गुहागर – 1 रुग्ण, घरडा, खेड – 3 रुग्ण अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 813 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 4, संगमेश्वर 5, उपजिल्हा रुग्णालय कामथे 1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 1, आणि 33 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण मधील आहेत.

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 1336
बरे झालेले – 813
मृत्यू – 44
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 479

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:14 PM 22-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here