भविष्यात प्लॅस्टिकचे डेबिट कार्ड इतिहासात जमा होणार

0

नवी दिल्ली: भविष्यात प्लॅस्टिकचे डेबिट कार्ड इतिहासात जमा होणार आहेत. भारताची सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक भविष्यात डेबिट कार्ड बंद करण्याच्या विचारात आहे. पण अनेकांना डेबिट कार्ड रद्द झाल्यावर पैसे कोठून काढायचे असा प्रश्न झाला असेल पण याची सोयही केली असल्याचे सीबीआयने सांगितले आहे. स्टेट बँकेचे बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने एक योजना बनविली आहे. ही योजना सफल झाल्यास लवकरच ग्राहकांची डेबिट कार्ड रद्द होतील. तसेच ते पुढे म्हणाले, भारतात सध्या 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडीट कार्ड आहेत. आमची योजना डेबिट कार्डला वापरातून बाहेर करण्याची आहे. आम्ही डेबिट कार्ड कायमची बंद करू शकतो. एसबीआय डिजिटल प्रणाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर एसबीआयने ‘योनो’ प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. योनोमुळे देश कार्ड मुक्तीकडे वाटचाल करेल. त्यामुळे डेबिट कार्ड एेवजी योनोद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत. तसेच कोणत्याही दुकानातून डिजिटली पैसे अदा करून सामान खरेदी करता येणार असल्याचीही सोय असणार आहे, असे रजनीश कुमार यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले, बँकेने आधीच ६८ हजार ‘योनो कॅशपॉइंट’ उभे केले आहेत. पुढील १८ महिन्यांत ही संख्या तब्बल १० लाखांवर जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितले. स्टेट बँकेने यंदा मार्चमध्ये योनो कॅश सेवा सुरू केली आहे, जी ग्राहकांना डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सोय देत आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुरक्षित आहे. सुरुवातीला ही सुविधा १६,५०० एटीएममध्ये उपलब्ध करण्यात आली होती. बँकेने आता याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे रविशकुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here