पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात शिरून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी

0

रत्नागिरी : पोलिस कर्मचाऱ्याच्या घरात शिरुन शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार २० जुलै रोजी रात्री १०.३० वा.सुमारास आंबेडकरवाडी येथे घडली. उमेश उर्फ योगेश यशवंत पंडित आणि श्रीकांत मराठे (दोन्ही रा.पाली,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलिस हेड काँ. जयवंत गणपत बगड (३७,रा.वैभवसागर काँप्लेक्स आंबेडकर,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, जयवंत बगड आणि संशयित उमेश पंडित व श्रीकांत मराठे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. जयवंत बगड यांनी आपल्या पत्नीस पळवून नेऊन तिला घटस्फोट द्यायला लावला. तसेच तिला आपल्याविरोधात तक्रार देण्यास लावल्याचा गैरसमज पंडितने करुन घेतला. त्या रागातून सोमवारी रात्री पंडित आणि मराठे या दोघांनी बगड यांच्या घरात शिरुन त्यांना शिवीगाळ करीत ड्यूटीवर बाहेर मिळाल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 23-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here