बापरे ! जिल्ह्यात 24 तासात तब्बल 102 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; 5 रुग्णांचा मृत्यू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल शंभरपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मागील 24 तासात तब्बल 102 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामुळे बाधितांचा आकडा 1,438 झाला आहे. दरम्यान, 24 तासात पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या 49 वर पोचली आहे.

नव्याने पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय रत्नागिरी येथील 24 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील तब्बल 48 रुग्ण, दापोली 2 रुग्ण, घरडा खेड 27 रुग्ण आणि लांजा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने पाच बळी घेतले आहेत. यात राजापूर येथील एका 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा, तसेच रत्नागिरी येथे 68 वर्षीय ॲन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर खेड येथे 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच चिपळूण येथे 49 वर्षीय कोरोना रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 49 झाली आहे.

दरम्यान 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 858 झाली आहे. गुरुवारी बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 6, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही दापोली 3, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा खेड 21,कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर गुहागर 3 आणि 10 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे चिपळूण मधील आहेत.

➡ सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह – 1438
बरे झालेले – 858
मृत्यू – 49
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 531

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:41 PM 23-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here