ऑनलाईन पिझ्झा मागविणे पडले महागात; तरुणाला चोवीस हजारांचा गंडा

0

चिपळूण : शहरातील एका तरुणाला ऑनलाईन पिझ्झा मागविणे महागात पडले आहे. गुगल पे वरून पिझ्झा मागविणाऱ्या या तरुणाची तब्बल २३,८२७ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. याबाबत सोफिन अनिस शेख (१६, रा. ऑर्चिड अपार्टमेंट, काविळतळी-चिपळूण) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल व राजकुमार या दोन अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. २२ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सोफिन शेख याला पिझ्झाची ऑर्डर द्यायची होती. त्यानुसार त्यांनी डॉमिनोज पिझ्झा सर्च केले असता २५६९९९ या नंबरवर पिझ्झाची ऑर्डर देण्यासाठी फोन केला. यावेळी त्यांना समोरून एका नंबरवरून कॉल करतो, तो कॉल घ्या, असे सांगितले व लगेचच सोफिनला फोन आला. यावेळी पिझ्झाचे पेमेंट गुगल पे द्वारे करण्यास सांगून खाते नंबर व आयएफएससी कोड टाकण्यास सांगितले. त्यानंतर यूपीआय पीनदेखील टाकण्यास सांगितला. यानंतर त्याच्या खात्यामधून २३,८२७ रुपये काढले गेल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 24-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here