रक्तदान शिबिरात ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

संगमेश्वर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाहनानुसार चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात प्रत्येक जिल्हा परिषदवार रक्तदान शिबिर मोहीम घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. मोहिमेतील चौथे रक्तदान शिबिर संगमेश्वर तालुक्यातील शेखर निकम मित्रमंडळ, माखजन विभागातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने झाले. या रक्तदान शिबिरासाठी धामापूर, नारडुवे, कासे, पेढांबे, सरंद, माखजन, आरवली, कोंडिवरे, आंबव, कळंबुशी, मुरडव, करजुवे आदी गावांतील तरुणांनी सहभाग घेतला. या वेळी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:43 PM 24-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here