मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बॅंकेत वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात फडणवीस आणि राज्य सारकारवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायलयात दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांची पत्नी अमृता फडवणीस या अॅक्सिस बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा हा निर्णय घेण्यात आल्याचे या याचिकाकार्त्याने म्हटले आहे.
