ना. उदय सामंत याच्याकडून चिपळूणला रुग्णवाहिका

0

चिपळूण : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून चिपळूण शहर परिसरासाठी नगर परिषदेकरिता अत्याधुनिक कार्डिोंक रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख, न.प.तील गटनेते उमेश सकपाळ यांनी दिली आहे. चिपळूण शहराला न.प.च्या माध्यमातून अत्याधुनिक कार्डिोंक रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी अशी मागणी शिवसेना नगरसेवकांमधून व्यक्त झाली होती. याची दखल शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी घेतली. सकपाळ यांनी त्वरित या संदर्भात ना. उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ना. सामंत यांनी वस्तुस्थिती मान्य करून शहर परिसरासाठी न.प.कडे अशी अत्याधुनिक व सुसज्ज कार्डिोंक रुग्णवाहिका देण्याचे मान्य केले. त्यासाठी संबंधितांकडून प्रस्ताव व पत्र तातडीने द्यावे असे सांगितले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीतच अशी सुसज्ज रुग्णवाहिका न.प.कडे सुपुर्द करून लोकार्पणही करण्यात येईल, असे आश्वासन सकपाळ यांना दिले आहे. यावर सकपाळ यांनी ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यास सुरुवात केली असून याचा पाठपुरावा करीत असल्याची माहिती दिली आहे. या रुग्णवाहिकेचा फायदा येथील नागरिकांना होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 25-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here