विधानसभेला भाजप-सेनेची युती होणार नाही; नारायण राणेंचे भाकीत

0

मुंबई: विधानसभा निवडणूक अगदी तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे. भाजप-सेनेची युती होणार की नाही याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहे. दरम्यान यावर स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. लोकसभेत भाजप-सेनेत युती झाली होती मात्र विधानसभेला भाजप-सेनेची युती होणार नाही असे भाकीत नारायण राणे यांनी वर्तविले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

भाजप-सेना युती होणार नाही, मात्र याचा फटका शिवसेनेला बसेल आणि भाजपची सत्ता पुन्हा येईल असेही त्यांनी सांगितले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here