दारूच्या अति सेवनाने प्रौढाचा मृत्यू

0

दापोली : तालुक्यातील दाभोळ येथे दारू पिऊन उलट्या झाल्याने प्रौढाचा बाथरूममध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी दाभोळ पोलिस ठाण्यात आकस्किम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना दि. २३ जुलै रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास उघडकीस आली. महेश किसनदेव राय (४१, मूळ रा.गुहागर सध्या रा. दाभोळ) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत संजय मनोहर मोरे (५६, रा.दाभोळधक्का, दापोली) यांनी दाभोळ पोलिसांना खबर दिली आहे. याघटनेतील महेश याला दारूचे व्यसन होते. तो संजय मोरे यांच्याकडे भाडे तत्त्वावर रहात, होता. गुरुवारी दुपारी तो दारू पिऊन आला व बाथरुममध्ये उलट्या होऊन त्याचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक टेमकर करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:41 AM 25-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here