कुडाळ : पिंगुळी येथील श्री प.पू.सद्गुरू समर्थ राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 1 लाख रूपये व श्री प. पू.विनायक (अण्णा) महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 50 हजार रुपये असे एकूण दीड लाखाचा धनादेश पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला. प.पू .सद्गुरू समर्थ राऊळ महाराज मठाचे मठाधिपती प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज यांच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक क्षेत्रात सातत्याने मदत केली जाते. राज्यात सिंधुदुर्गासह सांगली, कोल्हापूर या भागात आठ दिवसापूर्वी अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे अनेकांची घरे वाहून गेली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या पूरग्रस्तांची कोट्यवधीची हानी झाली. ही हानी कधीही भरून निघणार नाही. पूरग्रस्तांच्या मनावर या परिस्थितीने फार मोठे संकट ओढवले आहे. राज्यभरातून या पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. आपण समाजाचे देणे लागतो या सामाजिक भावनेतून याच अनुषंगाने धार्मिक आरोग्य शैक्षणिक सर्व क्षेत्रात मदतीसाठी कार्यरत असणार्या पिंगुळी येथील श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व श्री प. पू. विनायक अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी यांच्यावतीने दीड लाखाचा धनादेश सोमवारी राऊळ महाराज समाधी मंदिरात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, जिल्हा नियोजन अधिकारी विकास पाटील यांच्याकडे अण्णा राऊळ महाराज यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. पूजनीय सौ. बाईमा, जिल्हा प्रशासनाचे महादेव शिंगाडे, नारायण माणगावकर, गुरुनाथ धुरी, सुधीर बालम, चॅरिटेबल ट्रस्ट पदाधिकारी दशरथ राऊळ, प्रमोद तेंडुलकर, प्रसाद कांडरकर, राजन पांचाळ, श्रद्धा खामकर, अशोक पवार, नाना राऊळ, प्रसाद दळवी, गणेश शिरसाठ, सुंदर मेस्त्री, उमेश धुरी, आबा राऊळ, अजित राऊळ, वासुदेव शेटकर, सुरेश मोरजकर, हर्षदभाई, स्वप्नील शेटकर, गोव्याच्या निहारिका पांगे, सुजाता सुवर्णा, चांगुना सावंत, उज्वला पेडणेकर, करूणा कोठावळे, प्रकाश पिंगुळकर, सागर राऊळ, मंगेश साटम, दत्तगुरु राऊळ, सिंधुदुर्गासह मुंबई-गोवा पुणे येथील ट्रस्टचे पदाधिकारी राऊळ महाराज भक्तजन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
