नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर फुपेरे येथे स्ट्रीट लाईट चा उद्घाटन सोहळा संपन्न

0

राजापूर : तालुक्यातील फुपेरे येथे आज नागपंचमीच्या शुभ मुहूर्तावर स्ट्रीट लाईट चा उद्घाटन सोहळा अलका यशवंत सावंत, सिंधूताई आत्माराम सावंत, जनाबाई शिवराम सावंत यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी वाडीतिल सर्व मंडळी उपस्थित होती. यावेळी जेष्ठ नागरिक हरिश्चंद्र (नाना) सावंत, देवजी सावंत, यशवंत सावंत, विश्वनाथ सावंत, चंद्रकांत सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री गणेश भक्त मंडळाचे अध्यक्ष श्री गजानन सावंत यांच्या हस्ते शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मंडळाचे अध्यक्ष गजानन सावंत, तसेच संपूर्ण ईलेक्ट्रिक कामामध्ये वेळोवेळी मदत करणारे श्री दीपक बाळकृष्ण सावंत, त्याचप्रमाणे संपूर्ण वेल्डिण्ग वर्क ज्यानी केले ते अंकुश पांचाळ यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यांत आला. त्याचप्रमाणे या लाईट साठी स्वतःच्या मीटर मधून कनेक्शन देणारे श्री राजू सावंत, शांताराम सावंत, मधुकर सावंत, सुमित्रा बाळकृष्ण सावंत, जयश्री जगदीश सावंत यांचा युवा प्रतिष्ठान पाटिलवाडी तर्फे सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:01 PM 25-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here