पाकच्या मदतीनेच अमेरिकेने केला लादेनचा खात्मा; इम्रान खान यांचा दावा

0

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अल् कायदाचा म्हेरक्या ओसामा बिन लादेन संबधीत मोठा खुलासा केला आहे. देशातील गुप्तचर संघटना आयएसआयनेच अमेरिकेला लादेनबद्दल माहिती दिली होती, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या मुलाखतीत केला आहे.  

यापूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या इम्रान खान यांनी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, देशातील गुप्तचर संघटना आयएसआयने ओसामा बिन लादेन पकडला जावा यासाठी त्‍याच्‍याशी संबंधीत संपूर्ण माहिती अमेरिकेतील हेरखाते सीआयएला दिली होती. फोन कनेक्शनच्या माध्यमातून आयएसआयने सीआयएला लादेनच्या जागेची माहिती पुरवली असल्‍याचे त्‍यांच्याकडून सांगण्‍यात आले. लादेनला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानी डॉक्टर शकील अफ्रिदी याची सुटका करणार का ? या प्रश्नावर  इम्रान खान यांच्‍याकडून उत्तर देण्‍यात आले. 

पाकिस्तान पूर्वीपासूनच आपल्‍याकडे ओसामा बिन लादेन संबंधी कोणतीही माहिती नव्हती असा दावा करत आला आहे. पण पहिल्यांदाच जाहीरपणे पाकिस्तानने ओसामा बिन लादेन आपल्या भूमीवर असल्याची माहिती दिली. तसेच लादेन विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानने मदत केल्याचा खुलासा देखील यावेळी इम्रान खान यांच्‍याकडून करण्‍यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here