‘एस. कुमार’च्या उदयराज सावंत यांची आता नवी संकल्पना

0

➡ रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माध्यमातून रत्नागिरीवासीयांना सवलतीच्या दरात सेवा

रत्नागिरी : ‘साऊंड’ हा शब्द उच्चारला की रत्नागिरी जिल्ह्यात पहिलं नाव येतं ते एस. कुमारच्या उदयराज सावंत यांचे. कार्यक्रम कुठलाही असो, गाणं, नाटक, लोककला, वेगवेगळ्या सभा, असा कुठलाही कार्यक्रम असला तरी एस. कुमारची साऊंड सिस्टिम असली की चिंता करायचं कामच नाही. अगदी पनवेलपासून गोव्यापर्यंत एस. कुमार हे नाव आता विश्वासचं बनलं आहे. एस. कुमार साऊंड सर्व्हिसेसचे उदय सावंत आता एक नवी संकल्पना आणि सेवा कोकणवासीयांसाठी घेऊन येत आहेत. १७ मार्च १९९५पासून साऊंड व २००३पासून सुरु असलेल्या रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात अगदी माफक दारात आता ते नव्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

▪️ कराओके ट्रॅकवर गाण्याचे रेकॉर्डिंग
कराओके ट्रॅकवर गाणं रेकॉर्ड करायचं असो किंवा कराओके व्हिडिओ सॉंग रेकॉर्ड करायचा असो की अगदी आपल्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा गाण्यातून घ्यायचा असोत, या व अन्य सुविधा आता एस. कुमार साउंड सर्व्हिसेस सवलतीत घेऊन आली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात फेसबुक तसेच अन्य लाईव्ह कार्यक्रम, वैयक्तिक किंवा समूहासाठी करायचे असतील तरीही स्टुडीओ उपलब्ध केला जाणार आहे.

▪️ डिजिटल सुविधा माफक दारात
त्याचबरोबर अन्य ऑडिओ कॅसेट डिजिटलमध्ये करायची असेल, ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा फिल्म डबिंग असेल, रेकॉर्डिंग मिक्सिंग मास्टर, असे काही यासंबधी काही करायचे असेल तर ती सुविधा एस. कुमार साऊंड सर्व्हिसने सर्वांसाठी उपलब्ध केली आहे.

▪️ गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणार
आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा होणार असला तरी आपल्या बाप्पाची आरती, भक्तिगीते, गजर, अशी गाणे रेकॉर्ड करण्याची आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याची सेवाही अगदी अल्पदरात एस. कुमार साऊंड सर्व्हिसने सुरू केली आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवातील सीनचे रेकॉर्डिंगही करून दिले जाणार आहे.
या नव्या संकल्पनेचे स्वागत होत आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उदयराज सावंत यांच्याशी (९४२२०५२३५६) संपर्क साधता येऊ शकतो. विशेष म्हणजे ही सर्व प्रकारची कामे आरोग्य संदर्भात योग्य खबरदारी घेऊनच केली जाणार असल्याचे उदयराज सावंत यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:48 AM 27-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here