मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणला आज रक्तदान शिबिर

0

चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे चिपळूण विधानसभा प्रमुख संदीप सावंत यांनी आज (दि. २७ जुलै) रक्तदान आणि रक्ततपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. खेंड येथील वैश्य भवन हॉलमध्ये हे शिबिर होणार असून शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन कदम भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, सभापती सौ. धनश्री शिंदे, तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, शिवसेना तालुका समन्वयक राजू देवळेकर, शहरप्रमुख उमेश सकपाळ, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्त शासकीय रक्तपेढीला दिले जाणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 27-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here