पंतप्रधान मोदी कोरोनासाठी ‘या’ 3 राज्यात करणार अत्याधुनिक लॅबचं उद्घाटन

0

नवी दिल्ली : देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. तसेच ३१ जुलैनंतर अनलॉक ३ चा टप्पा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुंबई, कोलकाता आणि नोएडामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उच्च क्षमता असलेल्या कोविड-19 लॅबचं उद्घाटन करणार असल्याची माहिती मिळत देखील समोर आली आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य मंत्री, राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य सचिवदेखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:25 AM 27-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here