मिरजोळे येथे रसायनासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त; चौघांना अटक

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे 6 ठिकाणी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, अन्य उपयुक्‍त साहित्य असा एकूण 3 लाख 98 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी दिवसभर सुरू होती. सुरज यशवंत पाटील, श्रेया तेजस पाटील आणि मोनाली मोरेश्‍वर पाटील यांच्यासह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे  पोलिस निरीक्षक शिरीष सासणे, शहर पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजोळे येथील 6 ठिकाणी छापे टाकण्यात आले. यासाठी पोलिसांची तालुक्यातील लगतच्या पोलिस ठाण्यांची मदत घेण्यात आली. त्यातून तयार झालेल्या पथकांनी ही कारवाई केली. या पथकात रत्नागिरी शहर पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, पूर्णगड पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालय, ग्रामीण पोलिस ठाणे येथील एकूण सात अधिकारी व 50 कर्मचार्‍यांचा समावेश होता. या छाप्यात मिरजोळे पाटीलवाडीतील जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व अन्य साहित्य जप्‍त करण्यात आले. या गुन्ह्यात चौघांंना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here