मिरजोळे येथे हातभट्टीवर कारवाई

0

रत्नागिरी : मिरजोळे येथे शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत हातभट्टी सुमारे १२ हजार ८७५ रुपयांची दारू जप्त केली. संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद भगवान नाखरे (वय ६३, रा. नाखरेकरवाडी-मिरजोळे) असे संशयिताचे नाव आहे. शनिवारी (ता. २५) सकाळी साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. मिरजोळे-नाखरेकरवाडी येथे विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री व व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यात १२ हजार ८७५ रुपयांच्या दारूसह मद्देमाल जप्त केला. संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार पाटील करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:05 PM 27-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here