मनसेतर्फे १०वी व १२वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0

खेड : तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी शालेय परीक्षेत उत्तीण झालेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. खेड तालुक्यातील पार्थ पाडाळकर, मयुरेश दरेकर, मार्मिक दळी, हुमैरा परकार, जुई तटकरी, ईशा मेहता, आकाश पेवेकर, नियती देवळेकर या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शहराध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, मनविसे खेड तालुकाध्यक्ष पुष्पेन दिवटे, उपशहराध्यक्ष सिध्देश साळवी, दाद नांदगावकर, विभाग अध्यक्ष पियुष माने, वेरळ विभाग अध्यक्ष साई साळुखे, जयेश गुहागरकर, प्रदीप भोसले तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्याघरी भेट दिली. या उपक्रमातून मनसेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:29 PM 27-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here