31 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करु : प्रकाश आंबेडकर

0

अकोला : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊनच्या मुदतवाढीला जोरदार विरोध वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सरकारने 31 जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करु, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं. दरम्यान, मी उत्सुकतेपोटी कोरोना टेस्ट केली आहे. कोणी विचारलं तर प्रमाणपत्र दाखवता येतं, अशी मिश्कील टिपण्णी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अकोल्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘मी स्वतः कोविडची टेस्ट करुन घेतली आहे. राज्य सरकारने आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोक प्रतिनिधींची कोविड टेस्ट करुन घ्यावी. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, त्यांना शासनाने क्वारंटाईन करावं. मात्र, ज्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यांना फिरायला मोकळ करावं,’ असंही ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 28-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here