मत्स्य उद्योगांना जीएसटी करामधून सूट मिळावी

0

मालवण : मासळीवर प्रक्रिया करणार्‍या कंपन्यांवर जीएसटी कर प्रणाली लावल्याने त्यांनी मासे खरेदी करणे बंद केले आहे. याचा थेट फटका मच्छीमाराना बसत आहे. या कंपन्यांकडून मासे खरेदी केली जात नसल्याने पकडलेली लाखो रुपऐ किंमतीची मासळी वाया जात आहे. त्यामुळे मत्स्य उद्योगांना जीएसटी करामधून सूट मिळावी, अशी मागणी मालवण तालुका युवक काँग्रेसने शासनाकडे  केली आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार सुहास खडपकर यांना सादर केले. यासोबत कवडी मोल दराने विकावी लागणारी मासळीही नायब तहसीदारांना देण्यात आली. मत्स्य बंदी व नारळी पौर्णिमेनंतर मच्छीमारांनी नव्या हंगामाला सुरुवात केली आहे. मासळी चांगली मिळत असली तरी जीएसटी करामुळे मत्स्य कंपन्यांनी मासे खरेदी करणे बंद केले आहे. यामुळे मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मालवण दांडी, चिवला बीच येथील रापण मच्छीमारांना मिळालेली लाखो रुपऐ किंमतीची मासळी किनार्‍यावरचटाकून देण्याची वेळ आली. तर काही मासळी कवडीमोल दराने विकावी लागली. जीएसटीमुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होत असून मत्स्य उद्योगाला जीएसटी कर प्रणाली मधून सूट मिळावी अशी मागणी या निवेदनातून शासनाकडे करण्यात आली आहे. काँग्रेसचे तालुका सरचिटणीस तथा युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्‍ते अरविंद मोंडकर, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष योगेश्‍वर कुर्ले, गणेश पाडगावकर, सतीश सरमळकर, नागेश मोंडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here