किनारपट्टीवर ‘फिशरमन इकॉनॉमी झोन’ मंजूर करा

0

मालवण :सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25 हजार पेक्षा जास्त मच्छीमार कुटुंबे किनारपट्टीवर राहत असून त्यांचा मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. परंतु दरवर्षी नैसर्गिक आपत्तीस या समाजास तोंड द्यावे लागतेे. त्यामुळे या आपत्तीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून या किनारपट्टीवर फिशरमन इकॉनॉमी झोन मंजूर व्हावा, यासाठी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची  मंत्रालय येथे भेट घेतली व वस्तुस्थिती कथन केली. राज्य सरकारचे धूपप्रतिबंधक बंधार्‍यासाठी असलेला निधी व जिल्ह्याच्या 121 किमी. लांबीच्या किनारपट्टीसाठी होणारा खर्चाचा विचार करता दरवर्षी अपूर्ण निधी उपलब्ध होत आहे. हा झोन मंजूर झाल्यास त्या माध्यमातून मच्छीमार बांधवाना रस्ताकम बंधारा, बँकवाँटर, गाळ उपसा,  पाणी, लाईट, आरोग्य, मासेमारीसाठी  आवश्यक सुविधा किनारपट्टी उपलब्ध होणार आहेत. यासाठी मच्छिमार बांधवाना केंद्रस्थानी मानून केंद्र सरकारचा निधी यांसाठी उपलब्ध होऊ शकतो. याविषयी मंत्री  जानकर यांनी  हा  विषय गांभीर्याने घेऊन हा विषय सोमवार  26 ऑगस्ट  रोजी मंत्रालयात अधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार्‍या मिटिंगमध्ये घेण्याचे आदेश दिले.  तसेच हा विषय मार्गीं लावण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी अवि सामंत, रवींद्र खानविलकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here