रत्नागिरी:रत्नागिरीतील उद्यमनगर येथे राहणारा उबेदुउल्ला होडेकर व त्याच्या साथीदारांवर हल्ला प्रकरणी अटकेत असलेले मुन्ना देसाई, अल्ताफ संगमेश्वरी व त्यांच्या सहकार्यांना न्यायालयाने संशयाचा फायदा देवून निर्दोष मुक्तता केली. साऱ्या जिल्ह्याचे लक्ष या निकालावर होते. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यापासून आजतागायत हे सर्व आरोपी कैद होते.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमागील जागेत १२ ऑक्टोबर २०१८ च्या रात्री स्वाभिमान पक्षाचे उबेदऊल्ला निजामुद्दीन होडेकर (उद्यमनगर), फोडकर कॉम्प्लेक्स, व त्याच्या साथीदारांवर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यात मुदस्सर मेहबूब काझी (३५, रा. उद्यमनगर, राजापुरकर कॉलनी), अझर इकबाल सावंत (३२, राजापूर कॉलनी), हे जखमी झाले होते. या प्रकरणी उबेदउल्ला यांच्या भावाने ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अलताफ संगमेश्वरी, मुन्ना देसाई यांच्यासह ११ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातील काही आरोपी व फिर्यादी हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते.
