शिवसेनेत प्रवेश करणारा छगन भुजबळ दुसरा कुणीतरी असेल

0

नाशिक | शिवसेनेत प्रवेश करणारा छगन भुजबळ दुसरा कुणीतरी असेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रवेशाला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना प्रवेशाबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमी काँग्रेस-राष्ट्रवादीमधून युतीत जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. छगन भुजबळ पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा घडत आहेत.

मी सध्या येवल्यात आहे. माझ्या पक्षाचं काम करत आहे. शिवसेना प्रवेशाच्या बातम्या खोट्या आहेत. आणि जर अशा सातत्याने वावड्या उठत असतील तर तो छगन भुजबळ दुसरा कुणी असेल, मी नाही, असं भुजबळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here