मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव आता शिक्षण मंत्रालय असे होणार

0

मुंबई : मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव शिक्षण मंत्रालय करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिक्षणासंदर्भातील नव्या धोरणाला मंजुरी देण्यात आली. धोरणाबाबतची सविस्तर माहिती आज संध्याकाळी 4 वाजता होण्याऱ्या पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय करावे असा प्रस्ताव पूर्वीच देण्यात आला होता. या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच नवे शिक्षण धोरण देशात लागू करण्यात येणार असून याअंतर्गत उच्च शिक्षणासाठी संपूर्ण देशात एकच नियामक संस्था असेल. याद्वारे शिक्षण क्षेत्रातील अव्यवस्था नष्ट करता येऊ शकेल, असा विश्वास हे धोरण तयार करणाऱ्यांना वाटत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:58 PM 29-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here