कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर राज यांच्या चौकशीतून काही निघणार नाही, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अडचणीच्या प्रसंगी उद्धव ठाकरे भावाची पाठराखण करताना दिसत आहेत.
कॉंग्रेसच्या निमर्ला गावित आणि राष्ट्रवादी काँगेसच्या रश्मी बागल यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांना ईडीकडून बजावण्यात आलेल्या नोटीसबद्दल विचारले. तर ईडीच्या चौकशीतून काही साध्य होईल, असं मला वाटत नाही, म्हणत उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंची पाठराखण केली.
