राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन; ५ ऑगस्टपासून मॉल सुरू

0

मुंबई : केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या नियमात ३१ ऑगस्टपर्यंत वाढ केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही ‘मिशन बिगिन अगेन ३’ नुसार हा लॉकडाऊन ३१ ऑगस्ट २०२०च्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवला आहे. मात्र, काही आऊटडोअर खेळांना आणि मॉल्समधील दुकानांना ५ ॲागस्टपासून परवानगी देण्यात आलेली आहे. राज्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ जुलैला रात्री संपत होती. आता त्यात वाढ करण्यात आल्याचे शासनाने अद्यादेश काढून जाहीर केले आहे. राज्यात ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु होणार आहेत. सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स सुरु राहणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचे आदेश जारी करताना मॉल्समधील थिएटर, फूड मॉल तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पार्सल देण्यासाठी परवानगी दिली आहे. ‘मिशन बिगिन अगेन ३’ नुसार नव्याने शिथिलतेचे नियमही कायम राहणार आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती आधीच्या नियमांप्रमाणेच असणार आहे. तसेच काही आऊटडोअर खेळांना आणि माॅल्समधील दुकानांना ५ ॲागस्टपासून परवानगी देण्यात आलेली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लास बंद असणार आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरू राहील, असे केंद्राने जाहीर केले होते. सरकारने जी काही सूट दिली होती ती कंटेनमेंट झोनवगळता क्षेत्रासाठी आहे. कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहतील. रेल्वे आणि मेट्रो रेल्वे सेवा बंदच राहणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:59 AM 30-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here