गुहागर तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.४५ टक्के

0

गुहागर : इ.१० वीच्या माध्यमिक शालांत परिक्षेच्या निकालात गुहागर तालुक्याचा ९९.४५% निकाल लागून यशस्वी भरारी घेतली आहे. तालुक्यात गुहागर हायस्कूलच्या मिहीर मंदार आठवले याने ९९.२०% गुण संपादन करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुहागर हायस्कूलच्या सिमरन संजय नागवेकर हिने ९८.४०% गुण संपादन करुन तालुक्यात द्वितीय व मुलींमध्ये प्रथम तसेच गुहागर हायस्कूलच्या प्रफुल्ल साटले व चिन्मयी कुळे तसेच हेदवी हायस्कूलच्या सानिका वेल्हाळ यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तालुक्यातील २७ माध्यमिक विद्यालयांपैकी २२ हायस्कूलचा निकाल १००% व उर्वरित ५ हायस्कूलचा निकाल ९६ % पुढे लागला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन करून गुहागर तालुक्याची सुयशस्वी परंपरा राखली आहे. सुयशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:48 PM 30-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here