मणिपूरमध्ये जवानांवर दहशतवाद्यांचा हल्ला; तीन जवान शहीद

0

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये लष्काराच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, यात तीन जवान शहीद झाले असल्याचे सांगण्यात येत आहेत. दहशतवाद्यांनी आधी आयईडीचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर अंधाधूंद गोळीबार केला. मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात म्यानमार सीमेलगतच्या भागात दहशवाद्यांनी आसाम रायफल्सच्या जवानांवर हल्ला केला आहे. स्थानिक पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी आधी बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झाले आहेत. सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांच्या शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरु केली आहे. त्याचबरोबर भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. मागील वर्षीही नोव्हेंबर महिन्यात चंदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या छावणीवर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी छावणी बॉम्ब फेकले होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:48 PM 30-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here