मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

0

रत्नागिरी : श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळ नवी मुंबई पनवेल संचलित, मातोश्री कमलबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूल कुवारबाव, रत्नागिरी या शाळेचा शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० इयत्ता दहावीच्या पहिल्या बॅचचा निकाल १००% लागला असून यामध्ये ७ विद्यार्थ्यांनी यामध्ये सुयश संपादन केले आहे. विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी
१) कु. ऋतुजा प्रविण चव्हाण ८३.४०%, २) कु. सारा सचिन पडवळ ८०.६०% तसेच कु. तनिषा दिपक मोहिते., कु. खुशी राकेश शेट्ये, कु. आनंद अरुण दास. कु. राज दिगंबर देवरुखकर, कु. नूर महमद रईस खान, कु. जगदीश रुगाराम देवासी., कु. ओंकार प्रदीप सावंतदेसाई या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष. मा. श्री. धनराज डी.विसपुते साहेब, संस्थेच्या सचिव मा. सौ. संगीता धनराज विसपुते मॅडम संस्थेच्या संचालिका मा. श्रीमती. नंदा शेलार मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वजीत पवार सर, स्कूल कमिटी सदस्य, शिक्षक- पालक सदस्य, या विद्यार्थ्यांवर विशेष मेहनत घेणाऱ्या व मदत करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक वर्ग यांसकडून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:38 PM 30-Jul-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here