१६ जुलै १९६९ रोजी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने ‘अपोलो ११’ हे मानवरहित यान चंद्रावर पाठविले. त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच २० जुलै रोजी प्रथमच माणसाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाय ठेवले. या ऐतिहासिक घटनेला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. या घटनेची पन्नाशी पूर्ण होते ना होते तोच सोमवारी (२२ जुलै) भारताने चांद्रयान २ चे चंद्राच्या दक्षिण धृवाकडे यशस्वी प्रक्षेपण केले. दरम्यान, अमेरिकेच्या नासाने लागलीच आपल्या चांद्र मोहिमेविषयी नवीन घोषणा करत चंद्रावर पहिल्यांदा महिलेला पाठाविण्यात येणार व त्यानंतर पुरुषाला पाठविले जाईल, असे जाहीर केले. या मोहिमेला ‘आर्टेमिस’ असे नाव देण्यात आले आहे. नासाने आपल्या ट्विटर अकौंटवरून याची प्रसिद्ध केली आहे.