रत्नागिरी: टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार किरकोळ जखमी

0

रत्नागिरी : दुचाकीला टेम्पोची मागून धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वा. सुमारास शिवाजीनगर येथे घडली. सनी रमेश भानुशाली (२७. रा. टिआरपी.रत्नागिरी) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी सनी आपल्या ताब्यातील दुचाकी घेउन घरातून शिवाजी नगर येथे जात होता. तो शिवाजी नगर येथे आला असता, मागून येणाऱ्या अज्ञात टेम्पो चालकाने त्याच्या दुचाकीला धडक देत पळ काढला. टेम्पोच्या धडकेने सनीची दुचाकी घसरुन तो रस्त्यावर पडून किरकोळ जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here